कोथिंबिरीच्या जुडीसाठीच काय; मोटरसायकलीत पेट्रोल टाकायलाही एकेकाळी पन्नास रुपये खिशात नव्हते, पण आपल्या कामाप्रती भक्तिभाव दाखवत आव्हाळवाडीच्या भाऊसाहेब आव्हाळे यांनी अगदी प्रतिकूल परिस्थितीमधून आपले व्यवसाय एकामागोमाग एक सुरू केले आणि यशाचं यशोशिखर गाठलं. जाणून घेऊया त्यांचा प्रवास…
अणुरेणुया थोकडा l
तुका आकाशाएवढा l
या प्रसिद्ध अभंगात तुकाराम महाराजांनी आपण अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म व आकाशापेक्षाही विशाल कसे आहोत, याचं वर्णन केलं आहे. हा अभंग आठवण्याचं कारण म्हणजे भाऊसाहेब आव्हाळे. संत तुकारामांनी विठ्ठलाची एकरूप होऊन भक्ती केली, तशीच भाऊसाहेबांनी आपल्या कामाच्या प्रती अक्षरश: भक्ती केली. पै न् पै बाजूला ठेवली. अनेक व्यवसायांचा विस्तार करून ते यशस्वी करून दाखवले, उंचीवर नेले. एखाद्या यशस्वी आणि कोट्यधीश व्यक्तीच्या बाबतीत आपण विचार करतो, नक्कीच यानं प्रामाणिकपणे व्यवसाय केला नसेल, पण भाऊसाहेबांच्या बाबतीत तसं घडत नाही. अतिशय प्रामाणिकपणे आणि कष्टातून त्यांनी आपलं काम केलं आहे. भाऊसाहेबांशी आपण बोलतो तेव्हा त्यांची वाटचाल ऐकून थक्क होतो. त्यांचा कोथिंबिरीच्या जुडींच्या विक्रीपासून सुरू झालेला प्रवास आज इतका विस्तारलेला आहे की, एक माणूस एवढी झेप घेऊ शकतो? विश्वासच बसत नाही.
या प्रसिद्ध अभंगात तुकाराम महाराजांनी आपण अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म व आकाशापेक्षाही विशाल कसे आहोत, याचं वर्णन केलं आहे. हा अभंग आठवण्याचं कारण म्हणजे भाऊसाहेब आव्हाळे. संत तुकारामांनी विठ्ठलाची एकरूप होऊन भक्ती केली, तशीच भाऊसाहेबांनी आपल्या कामाच्या प्रती अक्षरश: भक्ती केली. पै न् पै बाजूला ठेवली. अनेक व्यवसायांचा विस्तार करून ते यशस्वी करून दाखवले, उंचीवर नेले. एखाद्या यशस्वी आणि कोट्यधीश व्यक्तीच्या बाबतीत आपण विचार करतो, नक्कीच यानं प्रामाणिकपणे व्यवसाय केला नसेल, पण भाऊसाहेबांच्या बाबतीत तसं घडत नाही. अतिशय प्रामाणिकपणे आणि कष्टातून त्यांनी आपलं काम केलं आहे. भाऊसाहेबांशी आपण बोलतो तेव्हा त्यांची वाटचाल ऐकून थक्क होतो. त्यांचा कोथिंबिरीच्या जुडींच्या विक्रीपासून सुरू झालेला प्रवास आज इतका विस्तारलेला आहे की, एक माणूस एवढी झेप घेऊ शकतो? विश्वासच बसत नाही.
या प्रसिद्ध अभंगात तुकाराम महाराजांनी आपण अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म व आकाशापेक्षाही विशाल कसे आहोत, याचं वर्णन केलं आहे. हा अभंग आठवण्याचं कारण म्हणजे भाऊसाहेब आव्हाळे. संत तुकारामांनी विठ्ठलाची एकरूप होऊन भक्ती केली, तशीच भाऊसाहेबांनी आपल्या कामाच्या प्रती अक्षरश: भक्ती केली. पै न् पै बाजूला ठेवली. अनेक व्यवसायांचा विस्तार करून ते यशस्वी करून दाखवले, उंचीवर नेले. एखाद्या यशस्वी आणि कोट्यधीश व्यक्तीच्या बाबतीत आपण विचार करतो, नक्कीच यानं प्रामाणिकपणे व्यवसाय केला नसेल, पण भाऊसाहेबांच्या बाबतीत तसं घडत नाही. अतिशय प्रामाणिकपणे आणि कष्टातून त्यांनी आपलं काम केलं आहे. भाऊसाहेबांशी आपण बोलतो तेव्हा त्यांची वाटचाल ऐकून थक्क होतो. त्यांचा कोथिंबिरीच्या जुडींच्या विक्रीपासून सुरू झालेला प्रवास आज इतका विस्तारलेला आहे की, एक माणूस एवढी झेप घेऊ शकतो? विश्वासच बसत नाही.

आव्हाळवाडीत गेल्यावर भाऊसाहेब आपल्याला भेटतात. माणूस जसजसा श्रीमंत आणि प्रसिद्ध होत जातो, तसतसा त्याला शहराचा झगमगाट आवडायला लागतो, पुण्याशेजारील गावांमधून तो शहराच्या उच्चभ्रू भागात लॅविश फ्लॅट घेतो. भाऊसाहेबांनी आपल्या विविध उद्योगांचा इतका मोठा डोलारा उभा केलाय, तरी त्यांना आपल्या गावाकडचं साधंसं आयुष्य समाधानी करतं. कोणताही व्यवसाय मन लावून केला तर माणूस यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांचं तत्त्वज्ञान ते स्वत: जगतात. भाऊसाहेब एका गरीब शेतकरी कुटुंबातले. त्यांचे आई-वडील अशिक्षित आहेत. ते शेती करत. भाऊसाहेबही त्यांच्याबरोबर शेतात राबत. शेतीतून कुटुंबाला पुरेसं उत्पन्न मिळत नसल्यानं ते इतरांच्या शेतात जाऊनही मोलमजुरी करत असत. हे शेतकरी कुटुंब म्हणजे आपल्या जमिनीवर माया करणारं.आव्हाळवाडीत गेल्यावर भाऊसाहेब आपल्याला भेटतात. माणूस जसजसा श्रीमंत आणि प्रसिद्ध होत जातो, तसतसा त्याला शहराचा झगमगाट आवडायला लागतो, पुण्याशेजारील गावांमधून तो शहराच्या उच्चभ्रू भागात लॅविश फ्लॅट घेतो. भाऊसाहेबांनी आपल्या विविध उद्योगांचा इतका मोठा डोलारा उभा केलाय, तरी त्यांना आपल्या गावाकडचं साधंसं आयुष्य समाधानी करतं. कोणताही व्यवसाय मन लावून केला तर माणूस यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांचं तत्त्वज्ञान ते स्वत: जगतात. भाऊसाहेब एका गरीब शेतकरी कुटुंबातले.
त्यांचे आई-वडील अशिक्षित आहेत. ते शेती करत. भाऊसाहेबही त्यांच्याबरोबर शेतात राबत. शेतीतून कुटुंबाला पुरेसं उत्पन्न मिळत नसल्यानं ते इतरांच्या शेतात जाऊनही मोलमजुरी करत असत. हे शेतकरी कुटुंब म्हणजे आपल्या जमिनीवर माया करणारं.
शेतीला जपणारं. हेच संस्कार भाऊसाहेबांना आपल्या आई-वडिलांकडून मिळाले. म्हणून आता एवढ्या उद्योगांचा डोलारा सांभाळत असतानाही त्यांनी आपल्या जमिनीला जीवापाड जपलंय. घरची एक गुंठाही जमीन त्यांनी विकलेली नाही. याउलट दीडदोनशे एकर जमीन विकत घेऊन ठेवली आहे; लॅन्डबॅंकसाठी.
शेतीला जपणारं. हेच संस्कार भाऊसाहेबांना आपल्या आई-वडिलांकडून मिळाले. म्हणून आता एवढ्या उद्योगांचा डोलारा सांभाळत असतानाही त्यांनी आपल्या जमिनीला जीवापाड जपलंय. घरची एक गुंठाही जमीन त्यांनी विकलेली नाही. याउलट दीडदोनशे एकर जमीन विकत घेऊन ठेवली आहे; लॅन्डबॅंकसाठी.
त्यांचं प्राथमिक शिक्षण आव्हाळवाडीत झालं. पुण्यातल्या वाडिया कॉलेजमध्ये ११वी ते बीकॉमपर्यंतचं शिक्षण घेतलं. शिक्षण झाल्यावरही ते लोकांच्या शेतात कामाला जायचे. पोटापुरतं अन्न मिळत असे; पण हातात पैसा नसे. जगायला पैसाही लागतो. भाऊसाहेबांचं लग्न झालं. शेतीवर उदरनिर्वाह होत नव्हता. एके दिवशी त्यांच्या पत्नीने त्यांना सल्ला दिला,
‘‘घरचा वाढता खर्च भागवण्यासाठी काहीतरी व्यवसाय करा.”
त्यांनी तो सल्ला मानला आणि अक्षरश: जादूची कांडी फिरावी, असे त्यांचे दिवस पालटू लागले.
त्याचं झालं असं…
ते वर्ष होतं, २००४. भाऊसाहेबांनी स्वतंत्र व्यवसाय करायला त्यांच्या आई-वडिलांनीही प्रोत्साहनच दिलं. ते म्हणाले,
‘‘आमच्याकडं जे होतं त्यात आम्ही तुला लहानाचं मोठं केलं. आता तू स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजेस.’’
कदाचित त्यांचाही आपल्या मुलाच्या धडाडीवर विश्वास असला पाहिजे. त्यांना एका मित्राने कोथिंबिरीच्या जुड्या विकायला दिल्या. त्या विकण्यासाठी मोटरसायकलवर जावं तर त्यात पेट्रोल भरायला पन्नास रुपयेही खिशात नव्हते. आता काय करायचं? पण मागे हटायचं नाही. भाऊसाहेबांनी त्यांच्या मित्राकडून पन्नास रुपये उधार घेतले आणि हडपसरच्या भाजी मंडईतल्या मित्राने उधार दिलेली पाचशे रुपयांची कोथिंबीर विकायला ते वाघोलीच्या आठवडी बाजारात गेले. त्यातून त्यांना दीड हजार रुपये मिळाले आणि हजार रुपये नफा झाला. एका दिवसात इतका फायदा… त्यांना आता व्यवसायाची दिशा सापडली होती. मुख्य म्हणजे आपण उत्तम प्रकारे व्यवसाय करू शकतो, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांचा दिनक्रम सुरू झाला, पहाटे तीन वाजता उठून बाजारात जायचं. तिथं होलसेलमध्ये कोथिंबीर घ्यायची आणि दिवसभर किरकोळीत जुड्या विकायच्या. पाचशे रुपयांचं भांडवल घातलं तर दिवसाअखेर दीडेक हजार मिळायचे. कोणत्याही नोकरदारांपेक्षा अधिक पैसे मिळत होते. पण ते यात समाधानी नव्हते. काळाची पावलं ओळखून चालण्याची पद्धत त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.
एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला जागतिकीकरणाचा रेटा वेगळ्या पाऊलखुणा दाखवत होता. या काळात मध्यमवर्गीयांनी पैसा पाहिला. अनेकजणांना वेगवेगळ्या व्यवसाय निर्मितीची नांदी लागली. पुण्यासारख्या शहराची अशावेळी बहुराष्ट्रीय कंपन्यांना भुरळ पडली नसती तरच नवल! त्यामुळं राज्यच काय, पण भारतभरातील लोकांची पावलं शिक्षण, नोकरी, गुंतवणूक यासाठी पुण्याकडं वळत होती. त्यामुळं शहरालगतच्या जमिनींना भलतीच मागणी होती. साहजिकच जमिनींचे भाव वाढत होते. नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीनं ही सुवर्णसंधी होती, हे ओळखून भाऊसाहेबांनी कोथिंबिरीच्या जुड्या विकून आलेले पन्नास हजार ते एक लाख रुपये छोटे-मोठे जमिनीचे प्लॉट खरेदी करण्यात गुंतवले. काही रक्कम आगाऊ देऊन प्लॉट गुंतवून ठेवायचा आणि त्या प्लॉटला ग्राहक पहायचे. त्या प्लॉटच्या विक्रीतून मूळ मालकाचं पेमेंट केल्यावरही कधी पाच, दहा हजार रुपये शिल्लक राहू लागले.
यातून त्यांनी भविष्यकाळात चांगली मागणी येऊ शकेल, असे प्लॉट खरेदी करून ठेवण्यास सुरुवात केली. यातून त्यांची आज दीडदोनशे एकराची लॅंडबॅंक तयार झाली आहे. या लॅंडबॅंकचा उपयोग त्यांना बॅंकेकडून कर्ज घेताना होत असतो.
ते सांगतात, ‘‘पुण्यात जमिनींचा भाव वधारला, तेव्हा लोकांनी त्यांच्या जमिनी विकायला सुरुवात केली; पण मी माझ्या वडिलांची जमीन विकायचा कधी विचारही केला नाही आणि करणारही नाही. अलिकडं आपण पाहतो, मुलांना आई-वडिलांकडून बरंच काही हवं असतं. ग्रामीण भागात तर वडिलांची जमीन विकून गळ्यात मोठ्या चेन, अलिशान गाड्या, मोठे फ्लॅट्स-बंगले घेण्याचं फॅड वाढलंय. मित्रानं जमीन विकून त्या पैशात गाडी, चेन खरेदी केली की, मीही त्यापेक्षा जास्त काहीतरी करायला पाहिजे, अशी स्पर्धा वाढलीय. चकचकाटी दिखाऊपणाला महत्त्व आलंय. ग्रामीण भागातल्या मुलांना जमिनींच्या बदल्यात आयता पैसा हवाय, ऐशोआराम हवाय; पण कष्ट करायला नकोत. जमीन गेलेलीच असते; पैशाला दाही दिशा फुटतात. तो पुरतोय का? मी या मुलांना सांगतो, बाबांनो,
जमिनी विकू नका. पैसा कष्टाने- बुद्धीने मिळवता येतो; पण गेलेली जमीन परत नाही मिळवता येत.
आजच्या वेगाने वाढणाऱ्या शहरीकरणामुळं भाव मिळतो म्हणून जमिनी विकायच्या, त्यातून चारचाकी घ्यायच्या किंवा सोन्याचे दागिने घालून मिरवायचे. पैसे आले की दोस्त येतात. मग दारूच्या पार्ट्या आणि राजकारण खुणावू लागतं. आपल्या वाढदिवसाचे फ्लेक्स लावावेसे वाटतात. यात एकदा शिरलं की, मूळ कामाकडं दुर्लक्ष होतं. पैसा येतो तसा निघूनही जातो. जमीन विकून आपलं अध:पतन करण्यापेक्षा तरुणांनी उद्योग व्यवसायात लक्ष दिलं, तर आपला महाराष्ट्र अशा तरुणांना आपल्या मुलखात अभिमानानं मिरवेल. मन लावून उद्योग
व्यवसाय केला तर तो यशस्वी होतोच, असा त्यांना अनुभव आहे. यासाठीच आसपासच्या होतकरू तरुणांसाठी भाऊसाहेब आव्हाळे एक आदर्श ठरावेत.भाऊसाहेबांना जमिनीच्या व्यवहारांनीही चांगली पत आणि पैसा मिळवून दिला. त्यांचा प्रत्येक व्यवसाय हा पारदर्शी पद्धतीनं केलेला असल्यानं व्यवसायाच्या क्षेत्रात त्यांचं चांगलं नाव होत होतं. कारण त्याच काळात लोकांना फसवूनही जमिनींचे व्यवहार करणारे बरेच जण उदयाला आले होते. या व्यवसायामुळं त्यांच्या भरपूर ओळखीही झाल्या. वेगवेगळ्या क्षेत्रांतले लोक, बांधकाम व्यावसायिक यांच्याशी त्यांचा चांगला परिचय झाला.
बांधकाम व्यवसायाशी निगडित व्यवसाय केला, तर आता ती काळाचीही गरज आहे, हे त्यांनी ओळखलं. त्यातून उदयाला आला तो रेडीमिक्सचा प्लँट. हा व्यवसाय तसा निराळाच. कारण आपण पाहतो की, कोणतंही घर किंवा इमारतींचं बांधकाम करताना सिमेंट आणि वाळूचं मिश्रण केलं जातं. रेडीमिक्सच्या प्लँटमध्ये ते जागेवरच तयार करून ‘रेडीमेड’ बांधकामाच्या ठिकाणी दिलं जातं.

त्यामुळं वेळही वाचतो. रेडीमिक्सची ही नवीन संकल्पना भाऊसाहेबांनी अंमलात आणली. त्यांनी २०१२ साली स्वत:च्या जागेत हा प्लँट सुरू केला. अशा प्रकारचा प्लँट सुरू करणं ही खायची गोष्ट नक्कीच नव्हती. त्यासाठी त्यांना रेडीमिक्स वाहून नेणाऱ्या दहा गाड्या, यंत्रसामग्री विकत घ्यायची होती. त्यांची व्यावसायिक नीतिमत्ता पाहून हे साहित्य देणाऱ्या कंपनीनं त्यांना
चांगलं सहकार्य केलं. कोणत्याही बांधकाम व्यावसायिकासाठी ही गोष्ट अगदी किफायतशीर असल्यानं रेडीमिक्सला मागणी वाढायला लागली. या व्यवसायातही जम बसला. भाऊसाहेबांचा प्रत्येक व्यवसाय त्यांच्या दूरदृष्टीनं भरभराटीस आलेला. रेडीमिक्सबरोबरच त्यांनी जेसीबी आणि पोकलेन खरेदी करून त्याचाही व्यवसाय सुरू केला. त्यांनी ज्या प्लॉटचे व्यवहार केले होते, त्याच प्लॉटवर इमारतींच्या बांधकामाची सुरुवात झाली होती. मुळात पारदर्शक असा व्यवहार केल्याने संबंधित बांधकाम व्यावसायिकांशी भाऊसाहेबांचे चांगले संबंध तयार झाले होते. त्या त्या साईटवर जेसीबी आणि पोकलेनशी संबंधित कामंही त्यांना मिळू लागली.

याचा परिणाम असा झाला की, रोजच्या खर्चासाठी लागणारे पैसे त्यांना यातून मिळायला लागले. दुसऱ्या बाजूने त्यांनी खरेदी करून ठेवलेल्या प्लॉटच्या किंमती वाढत होत्या. त्या जमिनींना मात्र त्यांनी हात लावलेला नाही.
एवढे व्यवसाय सुरू केले आणि ते भरभराटीस आणले म्हटल्यावर भाऊसाहेबांच्या जागी दुसरे कोणी असते तर ते इथेच थांबले असते; पण कोणतंही काम अत्यंत मनापासून करणाऱ्या भाऊसाहेबांना आता साखर कारखानदारी खुणावत होती. एकदा महेश करपे, मल्हारी चांदेरे या त्यांच्या कॉलेजमधील मित्रांनी भाऊसाहेबांना एका मिटींगसाठी बोलावले. विषय होता- पारनेरमधील सोपानराव बाळकृष्ण ढसाळ या कारखान्याचं लायसन्स घेऊन हा कारखाना उभा करण्याचा. साहजिकच एवढ्या मोठ्या आतापर्यंत न केलेल्या व्यवसायात उडी टाकायची तर साईट पाहिली पाहिजे. साखर कारखान्याचा कारभार समजून घेतला पाहिजे.
नगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातल्या त्या कारखान्याची साईट दुष्काळी भागात होती. कारखाना सुरू करायचा, तर पाण्याची गरज होती. पाणी तिथून अठरा किलोमीटर अंतरावर उपलब्ध होतं. तिथून पाणी आणण्याचं आव्हान भाऊसाहेबांनी पेललं. त्यांच्या आधी केलेल्या व्यवसायांचा त्यांना इथे उपयोग झाला. अवघ्या साडेतीन महिन्यांत पाणी आणून ६ मे २०१९ रोजी ‘कृषीनाथ ग्रीन एनर्जी’ या नावानं हा साखर कारखाना सुरू झाला.

या कारखान्याचं पहिलं गळीत १.६० मेट्रीक टन ऊसगाळपाचं झालं. या कारखान्याला महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेनं कर्ज दिलं. यासाठी त्यांना विद्याधर अनासकर यांची मोठी मदत झाली. आता या कारखान्यात साखरेबरोबर इथेलॉन आणि वीज निर्मितीही सुरू केली आहे. ६ मेगावॅटचा वीजनिर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. ही वीज महाराष्ट्र वीज वितरण कंपनीला ४.७५ रुपये या दरानं दिली जाते. याबरोबरच इथेनॉलही ६५ रुपये प्रतिलिटर दराने दोन पेट्रोलियम कंपन्यांना विकलं जातं. साखरेबरोबर इथेनॉल आणि वीजनिर्मितीही केल्यानं त्याचा तिहेरी फायदा झाला.
आता त्यांचा सीएनजी प्लॅंटही सुरू करण्याचा विचार आहे. ते संचालकपदी असलेला हा कारखाना उत्तम पद्धतीने सुरू आहे. इथल्या अनुभवाचा फायदा त्यांना दुसरा साखर कारखाना चालविताना झाला. बुलढाणा येथील बंद
पडलेला जिजामाता सहकारी साखर कारखाना त्यांनी लिलावात घेतलाय. आता हा कारखानादेखील सुरू होत आहे. हा कारखाना घेत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्याधर अनासकर यांचंही त्यांना चांगलं सहकार्य मिळालं. याखेरीज समृद्धी महामार्गाचंही काम त्यांनी काही प्रमाणात केलेलं आहे. वीस-पंचवीस वेगवेगळ्या कंपन्यामध्ये ते संचालक आहेत.

याशिवाय त्यांनी कपड्यांचा ब्रँडही विकसित केला असून बेअरबेरी या कपडे तयार करणाऱ्या ब्रँडच्या कंपनीत ते पार्टनर आहेत. विमाननगर येथील मॉलसह या ब्रॅंडची चाळीस आऊटलेट्स सध्या पुणे तसंच राज्यात इतरत्रही आहेत. उधारीत घेतलेल्या पाचशे रुपयांच्या कोथिंबिरीच्या जुडीपासून सुरू झालेला व्यावसायिक प्रवास कपड्यांच्या ब्रँडपर्यंत येऊन थांबला तर ते भाऊसाहेब कसले; ते आता बांधकाम व्यवसायात उतरलेत. इतकंच नाही, तर सौरऊर्जेचा मोठा व्यवसाय त्यांना खुणावतोय.
माणसाला थोडी प्रसिद्धी मिळायला लागली की, त्याची ऊठबस राजकीय वर्तुळात होऊ लागते. भाऊसाहेब मात्र याला अपवाद ठरलेत. म्हणूनच ते वेगळे ठरतात.

आपण जे व्यवसाय करतो आहोत, त्यावर त्यांचा फोकस आहे. राजकारण, स्पर्धा, आकस, आसुया या सगळ्या गोष्टी त्यांनी टाळल्या. चांगला व्यवसाय, उद्योग करणाऱ्याने राजकारणाच्या भानगडीत पडू नये, असं त्यांचं स्पष्ट मत आहे.
राजकारण करताना विरोधाला विरोध होतो. त्याचा परिणाम म्हणून व्यवसाय करण्यात अडचणी येतात. त्यामुळं व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांनी राजकारणाच्या वाटेला जाऊ नये, असा त्यांचा सल्ला आहे.
त्यांच्या व्यावसायिक गरुडझेपेत त्यांचे दोनच गुरू- प्रामाणिकपणा आणि काम करण्याची हातोटी. अगदी पहिल्यापासूनच घेतलेली कर्जे वेळोवेळी फेडल्यानं वित्त कंपन्या, बँका त्यांना नवीन व्यवसायासाठी आनंदानं कर्जरुपी आर्थिक मदतीचा हात पुढं करतात. इतके व्यवसाय एकाच वेळी यशस्वी करणाऱ्या भाऊसाहेबांचं प्रत्येक गोष्टीकडं बारकाईनं लक्ष असतं. आपण एखादाच व्यवसाय करत असू तरी तिथली माणसं, जमाखर्चाचं गणित, व्यवस्थापन आणि इतर गोष्टी सांभाळता सांभाळता दमछाक होते. भाऊसाहेब शांत मनानं एवढा व्याप सांभाळत असतात; तेही आपलं गाव, जमीन याबद्दल असलेलं नातं कायम ठेवून! या नात्यात त्यांनी कधीच तुटलेपण येऊ दिलेलं नाही. उलट गावाकडं राहायला त्यांना आवडतं. पुण्या-मुंबईत त्यांच्या सदनिका आहेत; मात्र ते आपल्या आई-वडिलांसह गावाकडच्या घरात राहतात. त्यांना ऊर्जा तसंच सतत प्रोत्साहन देणाऱ्या आई-वडील आणि पत्नीविषयी नेहमीच कृतज्ञ भाव त्यांच्या मनात असतात. तसंच कोथिंबिरीच्या जुड्या विक्रीसाठी उधारीनं देणाऱ्या मित्राचेही ते आभार मानतात. हातोटीनं व्यवसाय करण्याचं कौशल्य त्यांचं असलं तरी, या मित्रानं त्यांना त्याची सुरुवात करून दिली होती.
चारचाकी गाड्या दिमतीला असूनही त्यांचे वडील आजही वयाच्या ८४ व्या वर्षी सायकल चालवतात. त्यांच्या वडिलांची जीवनशैली अत्यंत आदर्श अशीच आहे. आजही ते इतके सक्रीय आहेत की, रोज सकाळी गावातून सायकलवरुन २५ किलोमीटरवर फेरफटका मारून येतात. शेतात काम करतात. या गोष्टी त्यांना आनंदी, ताजंतवानं ठेवतात. त्यांच्या ठणठणीत असण्याचं रहस्य सायकल चालवण्यात आहे, असं भाऊसाहेबांना वाटतं.

म्हणूनच आपल्या वडिलांना सायकल चालवण्यापासून ते रोखत नाहीत. उगाचच, ‘वय झालंय. आता घरात बसा’, असंही सांगत नाहीत. दरवर्षी आपल्या वडिलांचा वाढदिवस ते दणक्यात साजरा करतात. दर दोन-तीन वर्षांनी वडिलांना नवीन सायकल घेऊन देतात.
रेडिमिक्स प्लँटशेजारच्या जमिनीला लागूनच एक हजार सदनिकांचा गृहप्रकल्प तयार होतो आहे. गृहप्रकल्प बांधणाऱ्या व्यावसायिकांनी त्यांना, ‘तुमची जमीन मला विकता का ?’ असं विचारल्यावर भाऊसाहेबांनी ठामपणे नकार देत, ‘मराठी माणसालाही बिल्डर होऊद्या’, असं सांगत भविष्यातील आपल्या आणखी एका उद्योगाचं सुतोवाच केलं आहे.
मराठी माणसालाही बिल्डर होऊद्या

अठरा किलोमीटर अंतरावरून साखर कारखान्यासाठी पाणी आणले.
कोविड १९ साथीच्या काळात अनेक व्यवसायांवर परिणाम झाला होता. अनेक व्यवसाय ठप्प झाले. हातात वेगळे आर्थिक स्त्रोत नसल्यानं अनेक कुटुंबांची धूळधाण उडाली. अशावेळी भाऊसाहेबांना मात्र त्यांच्या वेगवेगळ्या व्यवसायांनी तारलं. त्यांना कधी काही कमी पडू दिलं नाही. टाळेबंदीचा एका व्यवसायावर परिणाम झाला तरी दुसरा व्यवसाय त्यांना हात देत असे, हे ते आवर्जून सांगतात. व्यवसाय क्षेत्रात घरातलं कोणीही नसताना, कोणताही गॉडफादर नसताना किंवा लाखो रुपये खर्चून तशी कोणतीही डिग्री घेतली नसतानाही भाऊसाहेब इतके यशस्वी का झाले? त्याचा ते मंत्र सांगतात-
तुमचं काम मन लावून करा. त्यासाठी कष्ट घ्या. तुम्हाला यशस्वी होण्यापासून कुणीही आडवू शकत नाही.

दिवसातल्या प्रत्येक सेकंदाचा व्यवसायांसाठी उपयोग कसा करायचा, हे भाऊसाहेबांकडून शिकावं. त्यांच्या तीन ऑफिसेसमधील माणसांनाही त्यांनी इतकं तयार केलं आहे की, ते खरे ‘मॅनेजमेंट गुरू’ आहेत. जगभरातील मॅनेजमेंटचं शिक्षण घेणाऱ्या मुलांसमोर ते आदर्श आहेत. हातात केवळ औपचारिक शिक्षण आणि डिग्री असली तरी अनुभव आणि मॅनेजमेंटचं अंगभूत कौशल्य अधिक महत्त्वाचं असतं, हेच भाऊसाहेबांनी दाखवून दिलंय. अनुभवाचा हात कुणी धरू शकत नाही. बेअरबेरी ही छान वासाची औषधी वनस्पती. त्याचं नाव आपल्या कपड्याच्या ब्रँडला देऊन भाऊसाहेबांनी आपल्या कर्तृत्वाचा दरवळ चोहीकडे पसरवलाय, असंच वाटतं.
COMMENTS