बांधकामाचं सुंदर जगत म्हणजेच ‘ब्युमोंड’ : संदीप सातव

स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा होता; पण डोक्यात बांधकाम क्षेत्र नव्हतंच. पुण्यातले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संदीप सातव यांनी नातेवाइकांच्या आग्रहाखातर बांधकाम क्षेत्राचा ‘ट्रॅक’ पकडला. यशाचं एकएक पाऊल टाकत ग्राहकांना घरकुल देणारं एक सुंदर जग निर्माण केलं. There are no secrets to success. It is the result of preparation, hard work and learning from failure. कोणत्याही क्षेत्रात एखाद्यानं यश मिळवण्यामागं नेमकं काय असतं, ते अमेरिकेचे तत्कालीन राजनीतितज्ज्ञ कॉलीन पॉवेल नेमक्या शब्दांत मांडतात. वाघोलीतील प्रथितयश बांधकाम व्यावसायिक संदीप सातव यांची वाटचाल पाहिल्यावर ते लक्षात येतं.

पुणे जिल्ह्यातील वाघोलीतल्या सातवांच्या घरात शिक्षणाला खूप महत्त्व होतं आणि आहे. संदीप सातव यांच्या वडिलांनी आपली दोन मुलं उत्तम शिक्षण कसं घेतील, याचा नेहमी विचार केला. ते स्वत: पदवीधर असल्यामुळं आपल्या मुलांनी खूप शिकावं आणि मोठं काही करून दाखवावं, असं त्यांना वाटायचं. त्या काळात इंग्रजी माध्यमाच्या शाळांना विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं. विज्ञान किंवा त्यासंदर्भातील क्षेत्रांत भविष्यात काम करायचं असेल तर मुलांनी इंग्रजी माध्यमातून शिकल्याशिवाय पर्याय नाही, अशी त्यांची मनोभूमिका होती.

आपल्या मुलांना उत्तम दर्जाचं शिक्षण देण्यासाठी ते वाघोलीतून चंदननगरला राहायला आले. मुलांना त्यांनी उत्तम दर्जाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं. या शाळेची फी खरंतर त्यांच्या आर्थिक स्थितीला झेपणारी नव्हती, पण त्याचा बाऊ न करता त्यांनी दिवसा नोकरी करून रात्री रिक्षा चालवली. मुलांच्या शिक्षणासाठी पैसे मिळवले. शिक्षणाला प्राधान्य दिलं. पुढं वडिलांच्या याच मेहनतीचे संस्कार आपोआप मुलांवर झाले.

संदीप सातव यांच्याबाबतीत हे लागू पडतं. गणित आणि विज्ञान या विषयांत विशेष रुची असलेल्या संदीप यांना सुरुवातीला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत थोडं बुजल्यासारखं झालं. तिथलं वातावरण, सहविद्यार्थ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि संदीपजींच्या आजूबाजूचं वातावरण यांचा मेळ घालणं थोडं जड गेलं. मुळातच हुशार असल्याने हळूहळू ते शाळेच्या वातावरणात रुळले. दहावीनंतर त्यांनी मॅकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. डिप्लोमा झाल्यावर त्यांना बीई आणि एमई करायचं होतं; पण त्याचवेळी त्यांचा धाकटा भाऊ बारावी उत्तीर्ण झाला होता. त्याला इंजिनिअर व्हायचं होतं. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे दोन्ही मुलांचा इंजिनिअरींगचा खर्च वडील करू शकत नव्हते. अर्थातच, संदीप यांनी नोकरीचा पर्याय स्वीकारला आणि त्यावेळी त्यांचा भाऊ इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊ लागला.

संदीपजींनी त्यांचं शिक्षण अर्धवट सोडलं नाही. त्यांनी त्यानंतर पुण्यातील वाडिया कॉलेजमधून अर्धवेळ शिक्षण घेत इंजिनिअरींगची पदवी मिळवली. इतर तरुणांप्रमाणेच चांगल्या पगाराची नोकरी मिळवावी, असं त्यांनाही वाटायचं.

त्याचवेळी नोकरी करून आर्थिक स्थैर्य मिळवणं जास्त आवश्यक होतं. नोकरी करणं हे ध्येय नसलं तरी अनुभव घेण्यासाठी आणि आयुष्यात स्थिर होण्यासाठी सातआठ वर्षं त्यांनी नोकरी केली. त्यानंतर त्यांना स्वत:चा व्यवसाय करायचा होता; तशी एक संधीही त्यांना उपलब्ध झाली.

ते नोकरी करत असलेली कंपनी दुसऱ्या मोठ्या कंपनीसाठी स्पेअर पार्ट तयार करत होती. त्यातला एक स्पेअर पार्ट तयार करणं खूप खर्चिक होतं. तो स्पेअर पार्ट कमी खर्चात कसा तयार करता येईल, याची विचारप्रक्रिया संदीपजींच्या मनात सुरू झाली. आपल्या सर्जनशीलतेचा आणि अभियांत्रिकीच्या शिक्षणाचा वापर करून त्यांनी तो पार्ट तयार केला. तो आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवला. त्यांनाही तो पसंत पडला. तो स्पेअर पार्ट तयार करण्यासाठी त्यांना कोणी व्हेंडर मिळत नव्हता. त्यावेळी संदीप यांनी, ‘हा स्पेअरपार्ट मी कंपनीला तयार करून देतो, हे काम मला द्या’, अशी विनंती वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली. या कामासाठी त्यांना कंपनीतील नोकरीचा राजीनामा द्यावा लागणार होता. संदीप हे कंपनीतले अतिशय चांगले कर्मचारी असल्यामुळं त्यांच्या वरिष्ठांना त्यांनी कंपनीतून बाहेर पडून हे काम करणं आवडलं नव्हतं. संदीपजींचा निर्धार पाहून त्यांनी परवानगी दिली. त्याचवेळी त्यांनी, ‘जर या व्यवसायात अपयश आलं, तर पुन्हा कंपनीत या’, अशी अटही संदीपजींना घातली. चांगली नोकरी सोडून व्यवसाय सुरू करणं, हा खरं तर आर्थिक घडी बसलेल्या आणि त्याची सवय झालेल्या कुटुंबांच्या दृष्टीने अतिशय विचित्र वाटणारा निर्णय असतो. सर्वसामान्य मराठी माणसांच्या शब्दांत सांगायचं तर भिकेचे डोहाळेच! कुटुंबियांची समजूत कशी घालायची, हा खरा प्रश्न होता. वडिलांशी या विषयावर बोलल्यावर व्यवसाय करण्यासाठी त्यांनी नकार दिला नाही, पण ‘या व्यवसायासाठी कोणतंही भांडवल मी देऊ शकत नाही’, असं मात्र सांगितलं. आपला व्यवसाय मोठ्या जोमानं उभा राहील, हा आत्मविश्वास संदीपजींना होताच. एक वर्कशॉप ओळखीतून घेतलं आणि ठराविक कालावधीत स्पेअर पार्ट तयार करायला त्यांनी सुरुवात केली. व्यवसाय नवीन होता, त्यामुळं त्यातून फार पैसे हाती लागत नव्हते. पण नोकरीत असताना मिळणाऱ्या पगारापेक्षा फार कमी पैसे शिलकीत पडायचे. त्यांची मेहनत आणि कामातला नेमकेपणा पाहून हळूहळू आणखी काही ऑर्डर्स मिळत गेल्या आणि त्यांचा चांगला जम बसला.


संदीपजींनी त्यांचं शिक्षण अर्धवट सोडलं नाही. त्यांनी त्यानंतर पुण्यातील वाडिया कॉलेजमधून अर्धवेळ शिक्षण घेत इंजिनिअरींगची पदवी मिळवली. इतर तरुणांप्रमाणेच चांगल्या पगाराची नोकरी मिळवावी, असं त्यांनाही वाटायचं.

ते नोकरी करत असलेली कंपनी दुसऱ्या मोठ्या कंपनीसाठी स्पेअर पार्ट तयार करत होती. त्यातला एक स्पेअर पार्ट तयार करणं खूप खर्चिक होतं. तो स्पेअर पार्ट कमी खर्चात कसा तयार करता येईल, याची विचारप्रक्रिया संदीपजींच्या मनात सुरू झाली. आपल्या सर्जनशीलतेचा आणि अभियांत्रिकीच्या शिक्षणाचा वापर करून त्यांनी तो पार्ट तयार केला. तो आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवला. त्यांनाही तो पसंत पडला. तो स्पेअर पार्ट तयार करण्यासाठी त्यांना कोणी व्हेंडर मिळत नव्हता. त्यावेळी संदीप यांनी, ‘हा स्पेअरपार्ट मी कंपनीला तयार करून देतो, हे काम मला द्या’, अशी विनंती वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली. या कामासाठी त्यांना कंपनीतील नोकरीचा राजीनामा द्यावा लागणार होता. संदीप हे कंपनीतले अतिशय चांगले कर्मचारी असल्यामुळं त्यांच्या वरिष्ठांना त्यांनी कंपनीतून बाहेर पडून हे काम करणं आवडलं नव्हतं. संदीपजींचा निर्धार पाहून त्यांनी परवानगी दिली. त्याचवेळी त्यांनी, ‘जर या व्यवसायात अपयश आलं, तर पुन्हा कंपनीत या’, अशी अटही संदीपजींना घातली. चांगली नोकरी सोडून व्यवसाय सुरू करणं, हा खरं तर आर्थिक घडी बसलेल्या आणि त्याची सवय झालेल्या कुटुंबांच्या दृष्टीने अतिशय विचित्र वाटणारा निर्णय असतो. सर्वसामान्य मराठी माणसांच्या शब्दांत सांगायचं तर भिकेचे डोहाळेच! कुटुंबियांची समजूत कशी घालायची, हा खरा प्रश्न होता. वडिलांशी या विषयावर बोलल्यावर व्यवसाय करण्यासाठी त्यांनी नकार दिला नाही, पण ‘या व्यवसायासाठी कोणतंही भांडवल मी देऊ शकत नाही’, असं मात्र सांगितलं. आपला व्यवसाय मोठ्या जोमानं उभा राहील, हा आत्मविश्वास संदीपजींना होताच. एक वर्कशॉप ओळखीतून घेतलं आणि ठराविक कालावधीत स्पेअर पार्ट तयार करायला त्यांनी सुरुवात केली. व्यवसाय नवीन होता, त्यामुळं त्यातून फार पैसे हाती लागत नव्हते. पण नोकरीत असताना मिळणाऱ्या पगारापेक्षा फार कमी पैसे शिलकीत पडायचे. त्यांची मेहनत आणि कामातला नेमकेपणा पाहून हळूहळू आणखी काही ऑर्डर्स मिळत गेल्या आणि त्यांचा चांगला जम बसला.

हा व्यवसाय चांगला चालू असतानाच अचानक त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक दिवस उजाडला.

मेकॅनिकल शाखेत शिक्षण घेतलेल्या संदीपजींच्या आयुष्यात त्या दिवशी घरं बांधण्याच्या प्रकल्पाची संधी आली. त्यांचे मित्र असलेल्या एका बांधकाम व्यावसायिकांना वाघोलीत काम सुरू करायचं होतं, वाघोली हे संदीपजींचं गावच. तिथली माहिती असल्यानं त्यांनी संदीपजींना गृहप्रकल्पासाठी प्लॉट पाहायला सांगितलं. संदीपजींनी या परिसरातील गाडे कुटुंबाचा दोन एकरांचा प्लॉट पाहिला. गाडे कुटुंबीय त्यांच्या वडिलांच्या चांगले परिचयाचे असल्यानं ते प्लॉट देण्यास तयार झाले. त्यावेळी त्यांच्या मित्रांनी, ‘केवळ प्लॉट देण्यापेक्षा तूच का या व्यवसायात येत नाहीस? आपण हा गृहप्रकल्प उभा करू’, अशी विनंती केली. बांधकाम व्यवसायातलं शिक्षण नाही, त्यातला काहीही अनुभव नाही आणि एकदम दोन एकरांमधील गृहप्रकल्पाचं काम हाती घेणं, म्हणजे मोठीच जोखीम होती. सर्व बाजूंनी विचार करून त्यांनी या प्रकल्पात काम करण्यास होकार दिला. या प्रकल्पातून खरं तर त्यांना फार आर्थिक लाभ मिळाला नाही, पण नाव मात्र खूप मिळालं. मध्यमवर्गीय सदनिका (फ्लॅट) ग्राहकांसाठी या प्रकल्पांतर्गत स्वप्नवत वाटणाऱ्या अशा सुविधा तयार केल्या गेल्या होत्या. उदा. बगीचा, जलतरण तलाव वगैरे. बरेचदा असं दिसतं की, नफेखोरीच्या नादात व्यावसायिक आपल्या दर्जात तडजोड करतात; पण संदीपजींनी मात्र कोणतीही कमतरता ठेवली नाही. ते म्हणतात,

काही व्यावसायिक बरेचदा झटपट श्रीमंत होण्याच्या नादात ग्राहकांशी प्रामाणिक राहत नाहीत किंवा ‘वेगळे’ मार्ग चोखाळताना दिसतात, कारण ते व्यवसायाचा दूरदृष्टीने विचार करताना दिसत नाहीत. पण संदीपजींनी बांधकाम क्षेत्रात पावलं जपूनच टाकली. ग्राहकांचा विश्वास महत्त्वाचा मानला. त्यांनी पोलिसांना घरं देण्याचं केलेलं काम हा त्यांच्या व्यवसायातील एक सुखावणारा क्षण होता. पुणे ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्याशी झालेल्या चर्चेतून हा प्रस्ताव पुढे आला. जनतेसाठी चोवीस तास झटणाऱ्या बहुसंख्य पोलिसांची स्वत:ची घरं होत नाहीत. पोलिसांना कर्ज देण्यास वित्तसंस्था सहजासहजी तयार होत नाहीत, ही आणखी एक त्रासदायक बाब. पोलिसांना घरं मिळाली पाहिजेत, अशी सुवेझ हक यांची तळमळ होती. त्यातून संदीप सातव यांच्याबरोबर त्यांनी या घरांचं नियोजन केलं. नगर रस्त्यावर पोलिसांच्या घरांसाठीच घेतलेला एक प्लॉट होता. या प्लॉटवर प्रथम बांधकाम करायचं आणि त्यानंतर घरे तयार झाल्यानंतर ती त्या त्या पोलिसांच्या नावावर करून द्यायची. त्यानंतर पोलिसांना त्या घरासाठीचं कर्ज मिळणार. या कर्जाच्या रकमेतून संदीपजींना त्यांची रक्कम मिळणार, असा हा सगळा प्रकार होता. यात मोठी आर्थिक जोखीम होती, पण पोलिसांसारख्या समाजघटकांसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा यातून संदीप सातव यांनी हा प्रकल्प हाती घेतला आणि पूर्णत्वास नेला. या प्रकल्पानं त्यांना आत्मिक समाधान मिळालं.


या प्रकल्पांसह अकरा वर्षांत त्यांनी लहानमोठे सोळा प्रकल्प पूर्णत्वास नेले आहेत. त्यातले काही आंतरराष्ट्रीय दर्जाचेही आहेत. त्या त्या परिसराच्या गरजेनुसार गृहप्रकल्प उभे केले आहेत. काही उभे राहत आहेत. उदाहरण द्यायचं तर विमाननगरचं ऑक्सी ब्युमोंड. पुण्यामध्ये जेव्हा माहिती तंत्रज्ञानावर आधारित उद्योग उभे राहत होते, तेव्हा काही उपनगरं वेगानं विकसित होत होती. जगाच्या नकाशावर पुण्याला एक वेगळं स्थान मिळायला लागलं होतं. विद्येचं माहेरघर ते आयटी हब अशी पुण्याची ओळख नव्यानं होऊ लागली होती. अर्थातच, त्यामुळं पुण्याच्या विमानतळालाही अच्छे दिन आले आणि विमानप्रवास करणाऱ्यांची संख्या वाढायला लागली.

एकेकाळी एकाकी असलेला तो परिसर गजबजायला लागला. त्यामुळं विकसित होणारा महत्त्वाचा भाग म्हणजे पुण्याचं विमानतळ असलेलं विमाननगर. देशाच्या कानाकोपऱ्यातून शिकण्यासाठी आणि बलाढ्य पॅकेजच्या नोकरीसाठी येणाऱ्यांचा ओघ पुण्याकडं वळला, तेव्हा अनेकांनी राहण्यासाठी प्राधान्य विमानतळ परिसराला दिलं. मोठ्या पॅकेजेसमुळं हातात पैसा आला. परदेशात ये-जा करणाऱ्यांनी, राहणीमान उंचावलेल्यांनी प्रगत देशांतल्या घरांतील सुविधा पाहून सर्व सुविधांनी युक्त असलेल्या अत्युच्च दर्जाच्या सदनिकांना प्राधान्य दिलं. किंबहुना देत आहेत. हीच गरज ओळखून खास उच्चभ्रूंसाठी ‘ऑक्सी ब्युमोंड’ ची कल्पना संदीपजींना सुचली.

हा प्रकल्प विमानतळाच्या अगदी जवळ आहे. आपल्याला या प्रकल्पाचं नाव थोडं वेगळं वाटतं. खरं तर ब्युमोंड हा शब्द फ्रेंच आहे. त्याचा अर्थच ‘फाईन वर्ल्ड’ असा होतो. उच्चभ्रूंसाठी

बांधलेला पंचतारांकित सुविधांनी युक्त असा हा गृहप्रकल्प. पुण्याच्या विमानतळावरून बाहेर पडणाऱ्या रस्त्यावर ऑक्सी ब्युमोंडच्या ऑफिसमध्ये आपण प्रवेश करतो, त्यावेळेस आपल्याला हे काहीतरी वेगळं आहे, असं जाणवायला लागतं.

आंतरराष्ट्रीय दर्जाचं इंटिरिअर, मन प्रसन्न करणारा माहौल, प्रशस्त सदनिका यांचं रेखांकन पाहिल्यावर घर घेणाऱ्या अतिश्रीमंतांचा शोध इथं थांबतो. संदीपजींच्या ‘ऑक्सी बिल्डकॉर्प’ची ही किमया.

हा आर्थिकदृष्ट्या अतिसंपन्न, पण तेवढाच चोखंदळ ग्राहक. याआधी संदीपजी २५ ते ३० लाखांचे फ्लॅट तयार करत. त्यांना या प्रकल्पाच्या माध्यमातून आता २ कोटींचा फ्लॅट तयार करून विकायचा होता. यासाठी प्रथम स्वत:ची मानसिकता बदलण्यापासून त्यांनी सुरुवात केली. या प्रकल्पासाठीची सगळी टीम त्यांनी मुंबईहून आणली. कॉस्मोपोलिटन कार्यसंस्कृतीची झलक दाखवणारं ऑफिस उभं केलं. आज त्यांच्या या प्रकल्पातील बरेचसे फ्लॅट विकले गेले आहेत.

राहण्यासाठी एक सुंदर ठिकाण, आजूबाजूला झाडं, शांत परिसर, आखीवरेखीव स्थापत्य, मोठ्या बाथरूमसह प्रशस्त खोल्या, सौरउर्जेची सुविधा, मोठ्या बाल्कनी, ड्राय बाल्कनी, कार आणि पादचाऱ्यांसाठी सुनियोजित प्रवेशद्वार असं चित्र दिसतं. प्रत्येकाच्या गाडीला बॅटरी चार्जिंगची सुविधा असलेलं खास पार्किंग… हिरवळ, मुलांना खेळण्यासाठी देखणं मैदान, बॅडमिंटन हॉल, जिम… काय नाही इथं?


विमाननगरमध्येच दहा एकरांत एक प्रकल्प साकारण्याच्या ते विचारात आहेत. कोरेगाव येथे २५ एकर जागेत सध्या झाडं लावली आहेत. तिथंही भविष्यात नवीन प्रकल्प साकारला जाऊ शकतो. एखादा व्यावसायिक प्रकल्प उभा करुन तो भाडेतत्वावर द्यावा, त्यातून नियमित उत्पन्न मिळविता येईल. याबाबतही विचार सुरू आहे. एका मराठी माणसाचा हा प्रवास खरंच इतरांना प्रेरणा देणारा आहे. इतके मोठे बिल्डर होऊनही संदीपजींचं आपल्या गावाशी, मातीशी घट्ट नातं आहे. बदलत्या काळाप्रमाणे माणसानं व्यवसायात नवनवीन जे आहे त्याचा अवलंब करावा,

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा; पण आपल्या मातीशी असलेली नाळ तोडू नये हेच ते आपल्या जगण्या वागण्यातून सांगत असतात.

सुटीच्या दिवशी ते मुलांसह आपल्या शेतामध्ये जातात. मुलं तिथल्या मातीत रमतात, तिथल्या विहिरीत पोहतात, काळ्या मातीत आणि हिरव्या पिकांमध्ये त्यांना जगण्याचा आनंद गवसावा, यासाठी संदीपजी आणि त्यांच्या कुटुंबाचा सगळा खटाटोप असतो. आजही संदीप, त्यांचे बंधू आपल्या आई-वडील आणि सर्व कुटुंबासह एकाच घरात राहतात. त्यांची मुलगी सध्या लंडनला शिकते आहे. तिचा कल फायनान्स आणि खेळांमध्ये आहे.

शिक्षण पूर्ण झाल्यावर ती तिथंच नोकरी करण्याचा विचार करते आहे. सातवांच्या घरातील सगळ्या मुलांना त्यांचं हेच सांगणं आहे की. घरच्या व्यवसायावर अवलंबून राहू नका.

पापल्या आवडीची क्षेत्रं निवडा, तिथं स्ट्रगल करा आणि आपली जागा निर्माण करा.

आणि जरी घरच्या व्यवसायात यायचं

झालं, तरी इथंदेखील पहिल्या

पायरीपासून सुरुवात करून

आपली गुणवत्ता सिद्ध

करावी लागेल.

अकरा वर्षांच्या घरं बांधण्याच्या या व्यवसायात आजपर्यंत एकाही ग्राहकाची तक्रार नाही. जेवढं व्यवहारात ठरलेलं असतं, त्यापेक्षा थोडं जास्त देण्याची तयारी त्यांनी नेहमीच दाखवल्यानं ग्राहक समाधानी आहेत. ज्यांच्याशी जमिनीचे व्यवहार करून हे गृहप्रकल्प उभे राहिले, त्यांच्याशी पारदर्शक व्यवहार केल्यानं तेदेखील समाधानी आहेत. याखेरीज पर्यावरण रक्षण ही त्यांची प्राथमिकता आहे. त्यांच्या बांधकाम कंपनीच्या नावातच ऑक्सी आहे. त्यामुळं प्रत्येक प्रकल्पांतर्गत जास्तीत जास्त झाडं लावण्यावर त्यांचा भर असतो. तेथील रहिवाशांसाठी मन प्रसन्न करणारा बगीचा आणि गणपतीचं देऊळ असतं.

त्यांच्या घरात प्रत्येकालाच दहा ते बारा तास काम करण्याची सवय आहे. आजही सकाळी बाहेर पडल्यावर संध्याकाळी सातच्या आत मुलगा घरी आला, तर त्यावेळी वडील शेतावर काम करत असतात. त्यांनी मुलाला आपल्या आधी आलेलं पाहिलं तर विचारतात की, ‘बरं वाटत नाही का, आज लवकर कसा घरी आलास?’

आपण धडपड करुन तावून सुलाखून कणखरपणे उभं राहायचं, एवढंच त्याचं ध्येय असतं, जिद्द असते आणि जोखीम पत्करण्याची तयारीही असते. हेच संदीप सातव यांच्या वाटचालीतून लक्षात येतं. आपलं एक सुंदर घर असावं; आधुनिक सोयींनी सज्ज असलेलं. हे घरकुलाचं स्वप्न संदीपजी साकार करतात.

COMMENTS

error: Content is protected !!