ट्रान्स्पोर्टमधील ‘त्रिमूर्ती’ : प्रतापअण्णा गायकवाड

दोन माणसांचं बरेचदा भागीदारीत जमत नाही. धुसफूस होते. मतभेद होतात. त्यातून मार्ग वेगळे होतात. या विधानाला अपवाद म्हणजे- हवेली तालुक्यातील कदम-वाक वस्ती या गावातल्या प्रतापअण्णा गायकवाड यांनी आपला ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय भागीदारीत यशस्वीपणे चालवलाय; तोही पाच नाही, दहा नाही, तर सलग पन्नास वर्षं. आता त्यांच्या पुढच्या पिढ्या हा व्यवसाय सांभाळताहेत.

प्रतापअण्णा गायकवाड हे यशस्वी उद्योजक म्हणून नावाजलेले आहेत. त्यांचा त्रिमूर्ती ट्रान्सपोर्ट या नावाने गेली पन्नास वर्षं मोठा व्यवसाय आहे. तसंच पुणे बाजार समितीमधला प्रताप अण्णांचा कार्यकाळ असो वा ग्रामपंचायतमधून केलेलं काम… यातला प्रत्येक काळ त्यांच्या कर्तृत्वाला वाव देणारा राहिला आहे. आपला व्यवसाय, राजकारण आणि समाजकारण या प्रत्येक क्षेत्राचं त्यांनी सोनंच केलंय.

कदमवाक वस्ती हे हवेली तालुक्यातलं एक साधंसं गाव. या गावातल्या शेतकरी कुटुंबात १९५१ साली अण्णांचा जन्म झाला. हे गाव साठच्या दशकातल्या टिपीकल गावासारखं.

‘खेड्यामधले घर कौलारु’ हे गाणं चपखल लागू होईल असं. उतरत्या कौलांची घरं आणि वस्तीतील प्राथमिक शाळाही. या शाळेत त्यांचं सुरुवातीचं शिक्षण झालं. शाळा शिकायला त्यांना आवडायची. माध्यमिक शाळेचं शिक्षण गावातील शाळेत तर महाविद्यालयीन शिक्षण हे शहरात झालं. अण्णांच्या काळात पदवीपर्यंतचं शिक्षण हे बरंच मानाचं समजलं जाई. त्यामुळं शिक्षणाच्या निमित्तानं तीन वेगवेगळ्या सांस्कृतिक वातावरणात राहायला मिळालं. तिथलं जीवन अनुभवता आलं. १९७३ साली पदवी घेतल्यानंतर त्यांनी नोकरीसाठी प्रयत्न करून पाहिला, पण त्यात त्यांना यश मिळालं नाही.

नोकरी करण्याऐवजी स्वत:चा व्यवसायच का करू नये, असं त्यांच्या मनात आलं. त्यासाठी त्यांच्या मदतीला आला तो त्यांच्या घरचा ट्रॅक्टर.

घरच्या शेतीसाठी त्यांच्या वडिलांनी एक ट्रॅक्टर घेतला होता. तो ट्रॅक्टर अण्णांनी स्वत: चालवला आणि शेती नांगरली. तसंच त्या परिसरात साखर कारखाना सुरू झाल्यावर तिथला ऊस ट्रॅक्टरमधून वाहिला. हे काम करता करता त्यांच्या मनात ट्रक घ्यायचा विचार आला, पण नवीन ट्रक घेण्याइतके पैसे त्यांच्याजवळ नव्हते. ट्रक विकत घेण्यासाठी अण्णांना बँकही कर्ज देत नव्हती. त्याला पर्याय म्हणून त्यांनी सेकंड हँड ट्रक विकत घेतला. हा ट्रक त्यांच्या आयुष्यात आला आणि तो त्यांना अक्षरश: लकी ठरला. गावात तोपर्यंत कुणाकडंही ट्रक नव्हता. ट्रान्स्पोर्टच्या व्यवसायाचा अनुभवही नव्हता. हा व्यवसाय सुरू करणार असल्याचं सांगितल्यावर सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.


या ट्रकच्या सहाय्यानं त्यांचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय सुरू झाला. त्यांच्या शुभेच्छा हीच त्यांना केलेली मदत होती आणि प्रोत्साहनाची शिदोरीही. मालाची ने-आण करण्याच्या या व्यवसायासाठी त्यांना त्यांचे महाविद्यालयातले मित्र अशोक मोरे भागीदार म्हणून लाभले. हे दोघंही मित्र चांगले शिकलेले होते. व्यवस्थित विचार करणारे होते. तसंच त्यांची मतंही जुळणारी होती. त्यामुळं भागीदारीतला व्यवसाय असला, तरी ते तो इतका प्रामाणिकपणे करत असत की व्यवसाय वाढायला लागला. हा व्यवसाय त्यांनी पूर्ण ताकदीनं वाढवत नेला. अण्णा सांगतात की,

रेल्वेच्या मालगाडीतून येणारा माल वाहायला त्यांनी सुरुवात केली. तसंच १९८८ मध्ये सिमेंट वाहायला सुरुवात केली. त्यावेळी एवढी बांधकामं नसल्यानं सिमेंट वाहायचं प्रमाण कमी प्रमाणात होतं. ते वाहायला सुरुवात केली. चिकाटी सोडली नाही. जसजशी सिमेंटला मागणी यायला लागली तसा त्रिमूर्ती ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय उत्तम चालायला लागला.

सिमेंट वाहून नेणाऱ्या या गाड्यांना आता मागणी आहेच. व्यवसाय विस्तारात ट्रक आणि इतर गाड्यांचीही भर पडत गेली. आज त्यांच्याकडं शंभरेक ट्रक आहेत. ट्रक वाढत गेले तसे हमाल वाढत गेले. कर्मचारी वर्ग वाढत गेला. त्यात अण्णांनी पूर्ण समर्पित वृत्तीने योगदान दिलं. त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या कंपन्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे. लाखो, कोट्यवधी रुपयांचा माल या कंपन्या डोळे झाकून अण्णांच्या ट्रान्सपोर्टमधून पाठवतात. या कंपन्यांना मोरे आणि गायकवाड यांच्या ट्रान्स्पोर्टमुळं कसलीच काळजी नसते. आज त्यांच्याशी मोठ्या ; पण ठराविक कंपन्या जोडल्या गेल्यात. ते सांगतात,

‘‘मला भागीदार इतके चांगले मिळाले की, भागीदारीविषयी सर्वत्र चर्चा आहे. व्यवसायातली भागीदारी पन्नास वर्षं टिकणे ही दुर्मिळ गोष्ट आहे. हा सगळा शिक्षणाचा परिणाम आहे. आपण कमी शिकलेलो असलो की तिथं विचार नसतात, मीपणा असतो. आमच्या दोघांत हा कधी प्रश्न आला नाही. जे आहे ते दोघांचं सारखंच.’’

ट्रान्स्पोर्ट हा चोवीस तास चालणारा व्यवसाय आहे. रस्त्यावरून ही वाहनं चालत असल्यानं कधी काय होईल, ते सांगता येत नाही. अशावेळी नेहमी जागरूक असावं लागतं.

एका बाजूला व्यवसाय करत असतानाच त्यांना त्यांची राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातली आवड स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांना या दोन्ही क्षेत्रांची प्रचंड आवड होती. ते म्हणतात,

त्यांच्या राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणाची सुरुवात १९७८ साली झाली. तेव्हा कदमवाक वस्तीची ग्रामपंचायत नव्यानं झाली होती. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अण्णा उभे राहिले आणि चांगल्या मतांनी निवडून आले. ते शहरात जाऊन चार बुकं शिकलेले असल्यानं त्यांच्या ज्ञानाला आणि विचारांना गावात मान होता. तसंच सामाजिक प्रश्नांची, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असल्यामुळं त्याची जोड राजकीय क्षेत्रात काम करताना असेल तर माणूस अधिक सक्षमतेनं काम करू शकतो, याचा प्रत्यय ग्रामस्थांनाही येत होताच. सरकारी योजनांचा ग्रामस्थांना लाभ मिळवून देणे, कोणी अडचणीत असेल, तर त्यांना मदत करणे या बाबी तर होत्याच. हे करत असतानाच सहकार क्षेत्रही त्यांना खुणावत होतं. ट्रॅक्टरच्या मदतीनं यशवंत साखर कारखान्याच्या उसाची आणि साखरेची ने-आण करत असताना त्यांना सहकारी साखर कारखाने आणि सहकार क्षेत्र याची बऱ्यापैकी माहिती झाली होती.

अशातच यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली होती. त्यावेळी अण्णासाहेब मगर यांचं निधन झालं होतं.

प्रतापअण्णा गायकवाड हे निवडणुकीला उभे राहिले. त्यावेळी त्यांच्यासमोर फार मोठा पॅनल होता, म्हणजे म. गांधीजींचे शिष्य मणीभाई देसाई यांचा. त्यावेळचे अनुभव त्यांच्याच शब्दांत,

संपूर्ण हवेली तालुक्यात प्रतापअण्णा गायकवाड म्हणून कुणी व्यक्ती आहे, हे लोकांना समजलं. अण्णांना गावोगावी माणसं ओळखायला लागली. त्यानंतर बाजार समितीच्या निवडणुका लागल्या. त्यात मात्र अण्णा निवडून आले आणि उपसभापती झाले. त्यावेळी त्यांचा शरद पवारांशी परिचय झाला. या परिचयाचा लाभ मिळाला. ‘शरद पवारांच्या जवळची व्यक्ती’ म्हणून लोक ओळखायला लागले. विविध क्षेत्रांतील लोकांच्या ओळखी झाल्या. ती पूर्ण टर्म अण्णांनी उपसभापती म्हणून काढली. त्यानंतर ते साखर कारखान्यात चार वेळा सलग संचालकपदी आले. एकदा मार्केट समितीचे सभापतीही झाले.

हे करत असताना त्यांनी व्यवसायाकडं दुर्लक्ष होऊ दिलं नाही. अण्णा म्हणतात,‘‘राजकारण हे तात्पुरतं आहे; हे आळवावरचं पाणी आहे. व्यवसाय मात्र पोटपाणी म्हणजेच घर चालवण्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याकडं कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष होऊ दिलं नाही. आजतागायत तो व्यवसाय चांगला चालू आहे.

अण्णांचा बाजार समितीत मोठमोठ्या व्यापाऱ्यांशी संबंध आला. बाबा आढावांसारख्या सामाजिक कार्यकर्त्यांशी ओळख झाली. त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळालं. त्यांच्यासारख्या व्यक्तींनी अण्णांना अशा गोष्टी शिकवल्या की जीवनात त्याचा उपयोग होतोय, असं अण्णा म्हणतात. साखर कारखान्यात संचालक म्हणूनच असताना अण्णांनी अनेक लोकांच्या अडचणी सोडवल्या. त्यातच त्यांना समाधान आहे. आज ते ७४ व्या वर्षी समाधानी जीवन जगताहेत; कुठलीही राजकीय अपेक्षा न ठेवता. व्यवसायात काही करु इच्छिणाऱ्या नवीन पिढीला ते मोलाचा सल्ला देतात-

COMMENTS

error: Content is protected !!